वडवणी प्रतिनिधी
वडवणी तालुक्यातील उपळी फाटा ते उपळी या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून कंट्रोलर मार्फत कामाची चौकशी करा असे निवेदन अंतर राष्ट्रीय मानवाधिकार महासंगचे जिल्हा अध्यक्ष एजाज शेख यांनी दिले आहे.
उपळी येथील रास्ता हा सा. बां. विभाग अंतर्गत चालू असून सदरील गुत्तेदार हा बोगस करून फक्त पैसे लाटण्याचा काम करीत आहे. गावातील मुख्य चौकात झालेल्या सिमेंट रस्त्यात हा पूर्णपणे बोगस झाला असून त्यामध्ये कसल्याच प्रकारचा लोखंड न वापरता रस्ता बोगस करण्यात आलेला आहे. सदरील रस्त्याचे रुंदीकरण हे अंदाजपत्रकानुसार न करता बोगस करण्यात आलेले आहे. याच गुत्तेदाराने मुख्य दळणवळण असलेला पुलाचा जवडचा रास्ता हा २००१ सालीचा जुना असून त्याला न उकरता त्यावरच अंदाजे ६ इंचीचा थर देऊन बोगस केलेला आहे. या पुलावर कसल्याच प्रकारचा सौरक्षण नाही आणि य गुत्तेदाराने बोगस काम करण्याच्या उद्देशाने अर्ध्या रात्री जाण्या येण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अंधारात काम केलं व पर्यायी मार्ग नसल्याने तेथून अवजड वाहन जाऊन रोडवर भेगा पडले असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हा रस्ता मुख्य पुलाच्या बाजूने असून व पुलाला कसलाच सौरक्षण नसून रोडवर पडलेल्या भेगामध्ये वाहन जाऊन अपघात होऊन वाहन पुलाच्या खाली जाऊन नागरिकांचा जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काही अपघात झाले तर याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांची राहील याची नोंद घेऊन सदरील रस्त्याची वरिष्ठ कंट्रोलर मार्फत चौकशी करून बोगस रास्ता करणाऱ्या अधिकारी व गुत्तेदार याची बिल न देता त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी. हा रस्ता मुख्य दळणवळणीचा असूनपुढील कामावर लक्ष देऊन उत्कृष्ट दरजेचा रास्ता करून घ्यावा अश्या आशयाचे निवेदन अंतर राष्ट्रीय मानवाधिकार महासंघचे जिल्हाध्यक्ष शेख एजाज यांनी दिले आहे
