कापुस व सोयबीन प्रस्नी वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेस चा रास्तारोको हाजारो शेतकर्यांनी उपस्थीत रहावे: सचिन लंगडे,बजरंग साबळे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कापुस व सोयबीन प्रस्नी वडवणीत राष्ट्रवादी काँग्रेस चा रास्तारोको हाजारो शेतकर्यांनी उपस्थीत रहावे: सचिन लंगडे,बजरंग साबळे
वडवणी : वार्ताहार
वडवणी तालुक्यात सी सी आय शासकीय कापुस खरेदी केंद्र एकच चालु आसुन ते ही आठवड्यातुन एकच दिवस चालु आहे.ते नियमीत करावे सोयाबीन केंद्र बारदाणा उपलब्द करूण द्यावा.एस बी आय बँकेकडुन शेतकर्‍यांना त्वरीत कर्ज उपलब्द करुन द्यावे अदी मागण्यासाठी वडवणीत सोमवार दि ६ जानेवारी रोजी रास्ता रोको करण्याचा इशार्‍याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने कृ उ बा स सचिन लंगडे, ता अ बजरंग साबळे यांच्यासह अदींनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.

http://www.news24livebeed.in

सविस्तर वृत्त असे की वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापसाचे सी सी आय कापुस खरेदी केंद्र वडवणी तालुक्यात लोणवळ येथे एकच आहे.तेही आठवड्यातून बुधवार या एकाच दिवशी चालू असते.त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला कापूस व्यापाऱ्यांना कमी दराने द्यावा लागतो. लोणवळ येथील सी सी आय शासकीय खरेदी केंद्र नियमित आठवडाभर सुरू करावे.वडवणी येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याचे कारण सांगत सोयाबीन केंद्र बंद आसल्याने या सोयाबीन केंद्राला बारदाना तात्काळ उपलब्ध करून द्यावा, वडवणी येथील एसबीआय बँकेत पीक कर्जासाठी अडवणूक केली जात आहे. ते अडवणूक न करता तात्काळ शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी वडवणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सोमवार दि ६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा वडवणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तरी या रास्ता रोको मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

या वेळी तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन लंगडे,नगराध्यक्ष शेषराव जगताप,जि प सदस्य औदुंबर काका सावंत, अभिमन्यू कदम,पिंपरखेडचे सरपंच अशोक आप्पा निपटे,ग्रा प स वैभव मस्के,मा सरपंच विश्वासराव आगे,सरपंच अँड माधव शेंडगे,मा सरपंच लखन महागोविंद, ग्रा प स विजय मोरे,महादेव बप्पा रेडे,अदींनी केले आहे

Leave a Comment