भारतीय स्टेट बँक दिनानिमित्त मंगळवारी एसबीआय वडवणी शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन ग्राहक, शेतकरी,नागरिक, कर्मचारी व व्यापारी बांधवांना रक्तदान करण्याचे आवाहन
वडवणी :- प्रतिनिधी
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही 1 जुलै हा बँक दिन म्हणून सर्व भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यानिमित्ताने देशभरात बँक प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध सामाजिक व आर्थिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. स्टेट बँक ऑफ इंडिया वडवणी येथे देखील प्रतिवर्षी बँक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याचनिमित्ताने या वर्षीदेखील विविध उपक्रम राबवून बँक दिन साजरा करणार असल्याचे वडवणी येथील शाखेचे व्यवस्थापक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, 1 जुलै हा दिन राष्ट्रीय बँक दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो याच अनुषंगाने स्टेट बँक ऑफ इंडिया वडवणी शाखेच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर दि.२४ जून वार मंगळवार रोजी वडवणी येथील एसबीआय शाखेमध्ये संपन्न होणार आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून देशातील नागरिकांनी आपले स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी नेहमित व्यायामबरोबर रक्तदान करणे आवश्यक आहे. या रक्तदान शिबिराला तालुक्यातील ग्राहक, शेतकरी, नागरिक, कर्मचारी व व्यापारी
बांधवांना रक्तदान करण्याचे आवाहन बँकेचे व्यवस्थापक यांनी केले आहे.
