सेवा निवृत्ती सोबतच जीवनाचाही घेतला निरोप केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी दत्तात्रय कदम यांचा सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाल्यामुळे हळहळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सेवा निवृत्ती सोबतच जीवनाचाही घेतला निरोप केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी दत्तात्रय कदम यांचा सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाल्यामुळे हळहळ

वडवणी प्रतिनिधी
सलग ३९ वर्ष शिक्षकी पेशेत प्रामाणिक सेवा केल्यानंतर केंद्रीय मुख्याध्यापक आणि विस्ताराधिकारी या पदावरून निवृत्त झालेले वडवणी तालुक्यातील पिंपरखेड केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आणि बीड तालुक्यातील येळंबघाट या गावचे मूळ रहिवासी असलेले दत्तात्रय वसंतराव कदम यांचा निरोप समारंभ कार्यक्रम गुरुवारी ३१ जुलै रोजी पिंपरखेडात थाटामाटात पार पडला होता. तालुक्यातील शेकडो शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना मानपाना सह मोठ्या समारंभात निरोप दिला होता. मात्र नियतीने या निरोप समारंभातील आनंद जास्त वेळ टिकवून दिला नाही. अवघ्या एक दिवसानंतर दत्तात्रय कदम यांच्या जीवनालाच निरोप घेण्यात आला. त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सेवानिवृत्तीनंतर अवघ्या एक दिवसानंतरच जीवनाला निरोप देणाऱ्या कदम सरांच्या मृत्युच्या घटनेमुळे शिक्षण विभागातील आणि सर्व मित्र परिवारात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दत्तात्रय वसंतराव कदम हे मूळ बीड तालुक्यातील येळंबघाट या गावचे रहिवासी होते. मागील ३९ वर्षांपूर्वी शिक्षक म्हणून कार्यरत झालेले दत्तात्रय कदम यांनी मागील बारा वर्षापासून केंद्रीय मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळली. केंद्राचे मुख्याध्यापक पद सांभाळत असताना त्यांनी दररोज सकाळी नऊ ते शाळा सुटेपर्यंत कधीही शाळेतून गैरहजेरी लावली नाही. आपल्या कामाशी प्रामाणिक आणि विद्यार्थ्यावर सच्चा प्रेम करणारा एक शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांचं नाव सर्वत्र परिचित होतं. शिक्षकांवर आपल्या लहान भावासारखे प्रेम करणारा आणि विद्यार्थ्यांना आपल्या लेकरासारखी माया लावणारा एक शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. गेल्या महिन्यातच त्यांची केंद्रप्रमुख पदावरून विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती. गुरुवारी ३१ जुलै रोजी ते पदावरून निवृत्त होत होते. त्यांच्या निवृत्तीचा भव्य कार्यक्रम पिंपरखेडात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वडवणी तालुक्यातील शेकडो शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी त्यांच्या कार्याचा उल्लेख करून असा प्रेम लावणारा आणि नोकरीत प्रामाणिक सेवा देणारा शिक्षक म्हणून दुर्मिळ असल्याचे सांगितले होते. यावेळी सर्व शिक्षक त्यांना निरोप देताना भावनिक झाले होते. त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानंतर अवघ्या एक दिवसानंतर दत्तात्रय कदम यांचे निधन झालं. केवळ एक दिवसही आपल्या सेवेपासून ते दूर राहू शकले नाहीत त्यांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पोहोचल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे.

कुटुंब आणि मातीची सेवा करण्याचे गेले राहून

दत्तात्रय कदम यांनी मागील ३९ वर्षाच्या सेवेत कधीही कर्तव्यात कसूर केला नाही शाळेत सकाळी नऊ वाजता हजर व्हायचं आणि शाळा सुटल्यानंतर साडेचार वाजताच परत जायचं केंद्रीय मुख्याध्यापक असतानाही त्यांनी पूर्णवेळ शाळेत वेळ दिला. त्यामुळे पिंपरखेड शाळेची उन्नती झाली. निवृत्ती झाल्यानंतर आता मी शेतीमध्ये काम करणार आहे. झाडे लावणार आहे. निसर्ग संगोपन करणार आहे आणि कुटुंबाला वेळ देणार आहे असं ते सांगत होते. मात्र नियतीला हे मान्य नव्हतं त्यांचं झाड लावण्याचे आणि कुटुंबाला वेळ देण्याचा स्वप्न अधुर राहीलं.

तालुक्यातील नंबर एकची शाळा

दत्तात्रय कदम हे ज्या पिंपरखेड शाळेचे मुख्याध्यापक होते. त्या शाळेत वडवणी तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. ते ज्या वेळेस या शाळेत रुजू झाले होते त्यावेळी या शाळेत पावणे दोनशे विद्यार्थी होते मात्र ते निवृत्त झाले त्यावेळेस या विद्यार्थी संख्या अडीचशे पेक्षा जास्त आहे. त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्काराची देणगी दिली. या गावातील विद्यार्थी आज परिपूर्ण झालेले आहेत. म्हणून त्यांचा गावकऱ्यांनी देखील गौरव केला होता. त्यांच्या निधनामुळे पिंपरखेड गावावर देखील शोककळा पसरले आहे.

http://www.news24livebeed.in

Leave a Comment