वडवणीच्या रेणुकामाता संस्थानातील शिवमहापुराण कथेचा प्रारंभ महिलांसह शिवभक्तांची मोठी उपस्थिती

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वडवणीच्या रेणुकामाता संस्थानातील शिवमहापुराण कथेचा प्रारंभ महिलांसह शिवभक्तांची मोठी उपस्थिती

वडवणी,दि.४(प्रतिनिधी):- वडवणी शहरातील ग्रामस्थांची आराध्य दैवता व शहरातील दक्षिणेस चिंचवण रोड या परिसरात निसर्गाच्या हिरव्यागार सानिध्यात वसलेल्या रेणुकामाता संस्थान या ठिकाणी भव्य शिवमहापुराण कथेचा प्रारंभ काल दि.४ ऑगस्ट २०२५ सोमवार रोजीपासून झाला आहे. कथेच्या या पहिल्या दिवशीच वडवणी सह पंचक्रोशीतील तमाम महिला भाविक व शिवभक्तांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. शिवमहापुराण कथेचे श्रवण करणे हे देखील एकप्रकारे जिवनाला नवी कलाटणी देणारी संधी ठरु शकते यासाठी उद्यापासून याठिकाणी आणखी गर्दी वाढू शकते असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडवणी शहरातील ग्रामस्थांची आराध्य दैवता व शहरातील दक्षिणेस चिंचवण रोड या परिसरात निसर्गाच्या हिरव्यागार सानिध्यात वसलेल्या श्री.रेणुकामाता संस्थान या ठिकाणी भव्य शिवमहापुराण कथेची सुरुवात काल दुसरा श्रावण सोमवारी म्हणजेच दि.४ ऑगस्ट २०२५ सोमवार रोजीपासून दैनंदिन सकाळी ११ ते २ या वेळेत संस्थान सभामंडपात झालेली आहे. महाराष्ट्रातील नामांकित शिवमहापुराण कथा प्रवक्ते ह.भ.प.शालीग्राम महाराज मते लोणीकर यांच्या वाणीतून या शिवमहापुराण कथेचे ह्रदयस्पर्शी असे विवेचन ऐकण्याची उत्तम संधी भाविकांना मिळाली आहे. त्यांच्या कर्णमधुर वाणीतून या शिवमहापुराण कथेची भव्यता अगदी सुक्ष्मपणे भाविकांच्या मनावर बिंबवली जात आहे. याप्रसंगी सिंथ वादक ह.भ.प.माऊली महाराज घुमरे, तर तबला वादक ह.भ.प.जगन्नाथ महाराज कराळे यांची त्यांना साथ लाभली आहे. तरी वडवणीकरांसाठी हा शिवमहापुराण कथा सोहळा म्हणजे मोठी अध्यात्मिक पर्वणी ठरत असून या कथेची सांगता दि.१० ऑगस्ट २०२५ रविवार रोजी भव्य महाप्रसादाने होणार आहे. दरम्यान याठिकाणी शिवमहापुराण कथेच्या आयोजनाचे हे सलग दुसरे वर्ष असून अण्णा महाराज दुटाळ यांनी गतवर्षी पहिल्यांदा आयोजित या शिवमहापुराण कथेच्या सांगतेप्रसंगी आपण यापुढील काळातही प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात याच ठिकाणी या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्याचे भाविकांना दिलेल्या वचनाचे त्यांनी तंतोतंत पालन केले आहे. वडवणीसह पंचक्रोशीतील महिला, माता भगिनींसह सर्व शिवभक्त व भाविक भक्तांनी या भव्य शिवमहापुराण कथेच्या दैनंदिन श्रवणासाठी गर्दी केली जात आहे. शिवमहापुराण कथेचे श्रवण करणे हे देखील एकप्रकारे जिवनाला नवी कलाटणी देणारी संधी ठरु शकते त्यामुळे यासाठी उद्यापासून याठिकाणी आणखी गर्दी वाढू शकते असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.

http://www.news24livebeed.in

Leave a Comment