सरपंच पुत्र व ग्रामसेवक यांनी अधिकारी यांना मॅनेज करून बनावट ग्रामसभा कागदपत्राचा बोगस कारभार चर्चा न करता, जाहीर प्रगट न करता बनवाबनवी करत शासनाची दिशाभूल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सरपंच पुत्र व ग्रामसेवक यांनी अधिकारी यांना मॅनेज करून बनावट ग्रामसभा कागदपत्राचा बोगस कारभार चर्चा न करता, जाहीर प्रगट न करता बनवाबनवी करत शासनाची दिशाभूल

वडवणी प्रतिनिधी :-

तालुक्यातील सोन्नाखोटा येथील रहिवासी चंद्रकांत बळीराम लांडे यांची ग्रामरोजगार सहाय्यक या पदावर नियुक्ती दि. २६/०४/२०२४ रोजी तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी माजी नियमानुसार निवड केलेली आहे. तेव्हापासून गावात जलसिंचन, विहिरीचे, रस्त्याचे, वृक्षलागवडीचे, गायगोठ्याचे कामे प्रमाणीकपणे करत आहे. सरपंच सौ.आशाबाई बिभीषण खोटे व ग्रामसेवक मोहित सुभाष ससाणे यांनी पंचायत समितीचे संबंधित अधिकारी यांना मॅनेज करून बनावट ग्रामसभा कागदपत्री बोगस दाखवून मला व ग्रामस्थांना कसल्याच प्रकारचे न कळविता शासन आदेशा विरुद्ध गैरवर्तन करत माझ्यावर अन्याय केला आहे.
द्वितीय ग्राम रोजगार सहाय्यकांची आवश्यकता नसताना सरपंच यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून सरपंच पुत्र ऋषिकेश बिभीषण खोटे यांची पंचायत समितीचे अधिकारी यांना हाताशी धरून नियमबाह्य पणे द्वितीय ग्रामरोजगार सहाय्यकाची नेमणूक केली आहे. आलेल्या ग्रामसभेचे सर्व व्हिडिओ, चित्रीकरण, ॲगलकॅम फोटो यांची तपासणी करण्यात यावी नियमबाह्य ग्रामसभा व नियमबाह्य द्वितीय ग्रामरोजगार सहाय्यक निवडीचा ठराव घेऊन दिशाभूल करणाऱ्या दोषी सरपंच ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी चंद्रकांत बळीराम लांडे यांनी निवेदनात केली आहे.

माझ्या विरुद्ध तक्रार नसतांना केवळ राजकीय द्वेष मनात धरुन रस्त्याचे बोगस मस्टर व दुतर्फा वृक्षलागवडीचे बोगस मस्टर काडत नव्हतो म्हणून केवळ बनावट ग्रामसभा दाखवुन गैरवर्तन केले आहे. ग्रामस्थांना व आम्हाला यांनी कसल्याही प्रकारचे कोठेही चर्चा न करता जाहीर प्रगटन न करता बनवाबनवी करत शासनाची व माझी दिशाभुल केली आहे. नियम बाह्य ग्रामसभा व नियम बाह्य द्वितीय ग्रामरोजगार सहाय्यक निवडीचा ठराव घेऊन दिशाभूल करणाऱ्या दोषी सरपंच ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकारी यांच्यावर कायदेशिर कार्यवाही करावी. व मला न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती.

चंद्रकांत बळीराम लांडे
ग्रामरोजगार सहाय्यक सोन्नाखोट्टा

 

Leave a Comment