सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्याचे मागणीसाठी वडवणी तालुक्यात कडकडीत बंद.
वडवणी प्रतिनिधी.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र बीड जिल्ह्यात उमटत असून काल गुरुवार रोजी वडवणी शहरातही या घटनेचा निषेध म्हणून वडवणी बंदची हाक देण्यात होती यामध्ये या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधाराला तात्काळ अटक करण्यासाठी वडवणी शहरासह तालुक्यात कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटनेमध्ये वाढ होत असून यामध्ये पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला नसल्यामुळे दिवसाढवळ्या अपहरण करून खून करण्याच्या घटना घडत आहेत यामध्ये बीडचा बिहार झाल्याची चर्चा संपूर्ण बीड जिल्हा नागरिकांमधून होत आहे यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंड यांनी निर्घृणपणे अपहरण करून हत्या केली या घटनेचा बीड जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जात असून ठीक ठिकाणी आंदोलने होत आहे याचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात उमटल्याचे पहावयास मिळत असून आज या घटनेचा निषेध म्हणून वडवणी तालुका वाशीयांनी वडवणी बंदची हाक दिली होती त्यामध्ये सकल मराठा समाज व सर्व राजकीय पक्षाच्या वतीने काल वडवणी शहरासह तालुक्यात कडाकडीत बंद पाळला यामध्ये वडवणी शहरात तरूण युवक रस्त्यावर उतरले यामध्ये शहरात पायी रॅली काढून या खुनाच्या घटनेतील राजकीय वरदहस्त असणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी करण्यात आली तसेच यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी हजारो मराठा तरुण या आंदोलनात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाले तरी वडवणी शहरात कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
