अंतरवलीत राज पाटील यांनी केले वृक्ष पुस्तक आणि प्रशस्तीपत्र वाटप मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर राबवला उपक्रम

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

अंतरवलीत राज पाटील यांनी केले वृक्ष पुस्तक आणि प्रशस्तीपत्र वाटप मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर राबवला उपक्रम

वडवणी प्रतिनिधी
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी सहा दिवस उपोषण केल्यानंतर त्यांच्या बहुतांशी मागण्या शासनाने मान्य केल्या त्यामुळे जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित केले उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी ॲड राज पाटील यांच्या वतीने सर्व उपोषण कर्ते आणि आंदोलनातील सहभागी मावळ्यांना पुस्तक झाड आणि प्रशस्तीपत्र देऊन मनोज दादा यांचे सहकारी प्रदीप दादा सोळंके यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मागील अनेक वर्षापासून मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या या संघर्षामध्ये मागील अनेक वर्षांपासून अनेक सहकारी काम करतात त्या सहकार्यामध्ये एडवोकेट राज पाटील हे सुद्धा एक महत्त्वाचे सदस्य आहेत. राज पाटलांनी जरांगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे. जरांगे पाटील मागील अनेक वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी उपोषणे आंदोलने करतात त्या त्या ठिकाणी राज पाटील यांनी आंदोलनामध्ये सहभाग तर घेतलाच याशिवाय त्या ठिकाणी आलेल्या लोकांना झाड पुस्तकाने तसेच प्रशस्तीपत्र वाटप केलेले आहेत. साष्ठपिंपळगाव, वडीकाळा, भांबेरी या ठिकाणीही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा उपक्रम राबवलेला होता. जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये राज पाटलांच मोठं योगदान लाभलेला आहे. या आंदोलनात देखील राज पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पूर्ण वेळ सहभाग नोंदवला तसेच आलेल्या सर्व आंदोलन कर्त्यांना झाड पुस्तक प्रशस्तीपत्र देऊन जरांगे पाटील यांची ज्येष्ठ सहकारी प्रदीप दादा सोळंके यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला. जरांगे पाटील यांचं आयुष्य मराठ्यांच्या भवितव्यासाठी गरजेचे आहे. यासाठी सर्व मराठ्यांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे अशा भावनाही राज पाटील यांनी व्यक्त केल्या.

२३ वर्षापासून अविरत काम

राज पाटील हे मागील २३ वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत लाखो झाडांचे वाटप केले आहे. मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मागील पाच वर्षापासून ते सक्रिय सहभागी आहेत. जरांगे पाटील यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता मराठा समाजासाठी प्राणाची बाजी लावून काम करत आहे. त्यांच्या पाठीमागे समस्त समाजाने उभा राहिले पाहिजे. जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे समाजाचे कल्याण होत असेल तर मी त्यांच्या पाठीमागे कायम उभा आहे. असं त्यांनी मागील
चार वर्षांपूर्वीच आपल्या भाषणातून सांगितलं होतं.

प्रदीप दादा यांनी केलं कौतुक

मनोज दादा जरांगे पाटील यांचे ज्येष्ठ सहकारी आणि सर्व मराठा बांधवांचे मार्गदर्शक प्रदीप दादा सोळंके यांनी राज पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे. राज पाटील हे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असून मराठा समाजासाठीही त्यांची मोठी तळमळ आहे असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.

 

Leave a Comment