एक तरी झाड लाव माणसा.. एक तरी झाड लाव वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्या गीताने डॉ. सोनाजीराव रांजवन विद्यालयात टाळ्या डॉक्टर सोनाजीराव रांजण विद्यालयाचा नामकरण सोहळा संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एक तरी झाड लाव माणसा.. एक तरी झाड लाव वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्या गीताने डॉ. सोनाजीराव रांजवन विद्यालयात टाळ्या डॉक्टर सोनाजीराव रांजण विद्यालयाचा नामकरण सोहळा संपन्न

वडवणी प्रतिनिधी
एक तरी झाड लाव माणसा.. एक तरी झाड लाव. झाड मागत नाही काही.. ते सदैव देतच राही… एकीकडे वृक्षतोडीचा सुमार कार्यक्रम प्रशासकीय व्यवस्थेकडून राबविण्यात येत असताना माणसाला जगण्यासाठी झाडांची गरज आहे. त्यामुळे माणसा एक तरी झाड लाव अशी आर्त हाक आपल्या गीतातून वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी देताच डॉक्टर सोनाजीराव रांजवन विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
वडवणी येथील प्रसिद्ध आणि नावाजलेल्या माध्यमिक विद्यालयाचे नामकरण डॉक्टर सोनाजीराव रांजवण विद्यालय असे सोमवारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदफणा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव रांजवण होते तर व्यासपीठावर नगराध्यक्ष शेषराव जगताप, उपनगराध्यक्ष बंन्सीभाऊ मुंडे, बाजार समिती सभापती संभाजी शिंदे, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, डॉक्टर शंकर वाघ, पत्रकार विनायक जाधव, पत्रकार अशोक निपटे, पत्रकार सतीश मुजमुले, पत्रकार अशोक फपाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ सोनाजीराव रांजवण विद्यालयाच्या नाम फलकाचे अनावरण करून मान्यवरांच्या हस्ते शाळेचा नामकरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी ऐनवेळी वृक्षमित्र सुधाकर देशमुख उपस्थित झाले. बीड परळी राज्य मार्गावर सुरू असलेली सुमार वृक्षतोड ही पोटाला पीळ आणणारी आहे. मागील अनेक वर्षापासून या रस्त्याचं सौंदर्य वाढवणारे आणि निसर्गाचे संगोपन करणारे हे झाडे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली कापले जात आहेत. मोठमोठे वृक्ष आडवी करून त्याचा नायनाट केला जात आहे. मात्र याला कोणीही विरोध करताना दिसत नाही. निसर्गाचा ऱ्हास होत आहे. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. पर्यावरण धोक्यात सापडले आहे. अशाही परिस्थितीत मोठ्या वृक्षाची कत्तल होणे ही पुढील पिढीसाठी धोकादायक बाब आहे. मात्र याकडे शासन आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहे. या बाबीकडे लक्ष वेधून आता माणसा जागा हो आणि तुच एक तरी झाड लाव. हे झाड आपल्याला ऑक्सिजन देणार आहे. आपलं जीवन वाचवणार आहे. हे झाड आपल्याला काहीच मागत नाही तर ते आपल्याला सदैव काही ना काही देत राहतं. अशा पद्धतीचा संदेश आपल्या गीतातून प्रख्यात वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांनी दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी एकच टाळ्यांचा कडकडाट केला. डॉक्टर सोनाजीराव रांजण यांनी सदैव आपल्या जीवनामध्ये सत्कार्य केलं त्यांच्या सत्कार्याचा विसर कोणीही पडून देऊ नाही असा अनमोल सल्लाही वृक्ष मित्र सुधाकर देशमुख यांनी दिला.
वडवणी येथील शिक्षण क्षेत्रामध्ये नामांकित असलेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला डॉक्टर सोनाजीराव रांजवन बापू यांचे नाव म्हणजे त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय केलेल्या कार्याचा गौरव होय असे पत्रकार अशोक निपटे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


तर शिवाजीभाऊ रांजवन (सिंदफणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष) यांनी बापूंच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकला. भावी काळातही हे विद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेईल असे आश्वासन त्यांनी दिले. तर वडवणी नगरपंचायतचे अध्यक्ष शेषराव बापू जगताप आपल्या भाषणामध्ये म्हणाले की बापूंनी वडवणी सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था उभारून ग्रामीण भागातील वाड्या रस्त्यावरील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले केले आहे. नगरपंचायत उपाध्यक्ष बन्सी भाऊ मुंडे यांनी देखील बापूंचे शिक्षण क्षेत्रातील कार्यांचे कौतुक केले.
विद्यालयाचे प्राचार्य वाय बी भोसले यांनी प्रास्ताविकात विद्यालयाचा शिक्षण क्षेत्रातील चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला, बापूंनी केलेल्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो त्यांचे या विद्यालयाला नाव दिल्यामुळे आणखीनच आमच्यावर जबाबदारी येऊन पडल्याचे सांगितले आणि ही जबाबदारी पेलण्यासाठी आणि विद्यालयाचे नाव अधिक रोशन करण्यासाठी येथील शिक्षक प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी समर्थ असल्याचे सांगितले संस्थेचे अध्यक्ष
शिवाजीभाऊ रांजवन आणि मा. प्रतापरावजी रांजवण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य वाया बी भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख बाबासाहेब जाधव, उपप्राचार्य जयदेव लांडे, भागवत बुंदाटे, अविनाश शिंदे, वसंत राठोड, सावंत सर, आत्माराम शिंदे, रघुवीर उजगरे, केशव लंगे आदी शिक्षक वृंद आणि संजय कल्याणकर, सुधाकर लांडे, भारत कटारे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Comment