पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अँड राज पाटील यांना जाहीर…….२८ जुनला बुलढाणा येथे पुरस्कार वितरण सोहळा आ प्रकाश दादा सोळंके यांनी दिल्या शुभेच्छा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अँड राज पाटील यांना जाहीर…….२८ जुनला बुलढाणा येथे पुरस्कार वितरण सोहळा आ प्रकाश दादा सोळंके यांनी दिल्या शुभेच्छा

वडवणी:- प्रतिनिधी
अँड राज पाटील हे लढा दुष्काळीशी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभरात लाखो झाडांचे वाटप करुन पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे सामजीक कार्य करत आहेत. तिगाव दुष्काळमुक्त व टँकर मुक्त करण्यासाठी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केलेली आहेत, याच सामाजिक कार्याची दखल संभाजीनगर येथील पहाट फाउंडेशनने घेतली आहे. त्यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार वितरण सोहळा २८ जून रोजी बुलडाणा येथे होणार आहे.

http://www.news24livebeed.in

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत चाललेली आहे. यामध्ये वेळेवर पाऊस न आल्याने कठीण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. सर्व मानवी जीवनाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजनची मोठी आवश्यकता आहे. ऑक्सिजनची कमतरता झाली तर काय होऊ शकते, याची प्रचिती कोरोना काळामध्ये सर्वांना आलेली आहे. झाडे टिकली तरच मानव जिवन जगण शक्य आहे. पुढील धोका टाळण्यासाठी पृथ्वीचे संतुलन टिकून राहण्यासाठी झाडे लावणे, झाडे जगवने, पाणी आडवने, पाणी जमीनीत मुरवने ही काळाची गरज ओळखुन अँड. राज पाटील यांनी लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण बीड जिल्ह्यातील गावागावांमध्ये झाडांचे महत्त्व सांगत जिजाऊ फिरता जन्मोउत्सव साजरा केला. यामध्ये वृक्षांची वाटप करून तेथील नागरिकांना ती झाडे जगविण्याची जिम्मेदारी दिली. मित्रपरिवारांच्या वाढदिवसानिमित्त व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेणे व रक्तदात्यांना झाडांचे वाटप करणे, मराठा आरक्षण चळवळीमध्येही येणाऱ्या सर्व समाज बांधवांना वृक्षांचे वाटप केले. दर वर्षी संक्रातीला सरपंच सौ. अर्चनाताई पाटील व राज पाटील या दाम्पत्याने महिलांना वाण म्हणून पुस्तक व झाडाचे वाटप केले. तालुक्यातील १०८ जि.प. शाळेतील १२,००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, कोरोना काळात गरजूंना किराणा किट व औषधांचे वाटप, सांगली, कोल्हापूर महापूर ग्रस्तांना २ ट्रक उपयोगी साहित्य प्रत्यक्षात वाटप, गावातील शेती रस्ते १६ किलोमीटर स्वखर्चातून, तलाव गाळ मुक्त व नद्या खोलीकरण सरळीकरण, गावातील बेरोजगार युवकांना हार्वेस्टर ऑपरेटर ड्रायव्हर या माध्यमातून शंभर पेक्षा जास्त तरुनांना रोजगार उपलब्ध करून दिला. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये वृक्षमित्र अँड राज पाटील यांनी मोफत लाखो वृक्ष वाटप केली नाही तर ती जगवूनही दाखवली. आपल्या तिगाव जन्मभूमी पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबऊन विविध जलसंधारणाच्या कामे नदी खोलीकरण व रुंदीकरण तलावातील गाळ उपसा करणे, बंधाऱ्याचे खोलीकरण करून जमिनीत पाणी टिकून राहण्यासाठी ताडपत्रीचे आच्छादन करून त्यामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तिगाव हे दुष्काळमुक्त व टँकर मुक्त होण्यास मदत होणार आहे. आदी कामाची दखल पहाट फाउंडेशन संभाजीनगर यांनी घेतली आहे. वृक्षमित्र लढा दुष्काळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज पाटील यांना पहाट फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर केला असून पुरस्कार वितरण सोहळा २८ जून रोजी बुलढाणा येथे होणार आहे. त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

पहाट फाउंडेशन चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे खास विश्वासू आमदार अमितजी गोरखे, माजलगाव मतदार संघांचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी अँड राज पाटील यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment