वडवणीत शेतकऱ्यांचे बोगद्या समोर मावेजासाठी अन्नत्याग व आमरण उपोषण आंदोलन सुरू. आज आंदोलनाचा तिसरा दिवस

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वडवणीत शेतकऱ्यांचे बोगद्या समोर मावेजासाठी अन्नत्याग व आमरण उपोषण आंदोलन सुरू. आज आंदोलनाचा तिसरा दिवस

वडवणी प्रतिनिधी ) – वडवणी शिवारातील गट नंबर 111, 110 व 160 मधील जमिनीवर बोगद्याचे दगड मुरूम मटेरियल टाकण्यात आले असून, संबंधित शेतकऱ्यांना अद्याप भू-भाडे व मावेजा मिळालेला नाही. या मावेजासाठी दुटाळ कुटुंबाने प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने 15 जुलै 2025 रोजी बोगद्याच्या ठिकाणी आमरण उपोषण व अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस सुरू आहे.
वडवणी शिवारातील गट क्र. 111 मधील 06 गुंठे जमीन अमोल बाबुराव दुटाळ यांच्याकडून पाटबंधारे विभागाच्या कालवा प्रकल्पासाठी 20 जानेवारी 2020 रोजी संपादित करण्यात आली आहे. परंतु आज पावेतो त्याचा मावेजा देण्यात आलेला नाही. तसेच गट क्र. 110 व 160 मधील जमीनीत व भूभागात बोगद्याचे दगड, मुरूम मटेरियल टाकण्यात आले असून त्या क्षेत्राबाबतचे, जमिनीचे भू-भाडे देखील अद्याप प्राप्त झालेले नाही.
या संदर्भात प्रयागाबाई मुक्ताजी दुटाळ, संगिता बाबुराव दुटाळ व अमोल बाबुराव दुटाळ यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी माजलगाव, तहसीलदार वडवणी व कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग बीड यांच्याकडे वेळोवेळी लेखी निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली आहे.व प्रशासनाला विनंती ही केलेली आहे परंतु कुठून द्यायच्या मागणीची प्रशासनाने अद्याप पर्यंत कसलीही दखल न घेतल्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांनी दिनांक 15 जुलैपासून बोगद्याच्या समोर जमिनीमध्ये आणण्यात व आमरण उपोषण आंदोलन सुरू केलेले आहे यामध्ये वयोवृद्ध महिला तरुण मुले हे सहभागी झालेले आहेत तरी त्यांच्या या आंदोलनाचा आज तिसरा दिवस सुरू आहे जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने आमच्या जमिनीच्या भाड्याच्या विषयी सोडवणूक न केल्यास प्रश्न मार्गी न लावल्यास स्वातंत्र्य दिनी
15 ऑगस्ट 2025 पर्यंत भू-भाडे व मावेजा मिळाला नाही, तर 10 ऑगस्ट रोजी आयुक्तालय, संभाजीनगर येथे उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दुटाळ कुटुबियाच्या वतीने दिलेल्या लेखी अर्जा व्दारे देण्यात आला आहे.

Leave a Comment