मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साळींबा उपसासिंचन योजनेस हिरवा कंदील 🔸डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या पाठपुराव्याला यश

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साळींबा उपसासिंचन योजनेस हिरवा कंदील 🔸डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या पाठपुराव्याला यश

वडवणी दि.4 (प्रतिनिधी):-
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काही भाग कायम दुष्काळी व आवर्षणप्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे बारमाही कोरडवाहू असलेली शेती ओलिताखाली आणण्यासाठी साळींबा उपसासिंचन योजना ही सदर भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असून शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र अनेक वर्षापासूनच्या या मागणीला देवदूत डॉ.ओमप्रकाश शेटे यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. सदरील योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला असून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबत जलसंपदा विभागाला सूचना दिल्या आहेत. सदरील योजनेमुळे हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
वडवणी तालुक्यातील काही भागात वारंवार दुष्काळ पडतो. अल्प पर्जन्यमान व जलस्रोतांची मर्यादा यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. परिणामी, शेती उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक हानी सहन करावी लागते. साळींबा उपसासिंचन योजना राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढून ओलिताखालील शेतीचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास देखील हातभार लागेल ही बाब शेटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
उपरोक्त योजनेचे अंदाजपत्रक तयार करून जायकवाडी टप्पा – 2 अंतर्गत सुधारित प्रशासकीय मान्यतेस्तव सादर करण्यात आले आहे. वडवणी तालुक्यातील कोरडवाहू शेतीस पाणी मिळण्यासाठी साळींबा ता. वडवणी जि. बीड उपसासिंचन योजनेस तातडीने मान्यता देऊन तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा आग्रह व विनंती डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती, त्यास यश आले असून सदरील योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला असून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबत जलसंपदा विभागाला सूचना दिल्या आहेत. सदरील योजनेसाठी माजलगाव धरणाचे बॅंक वाटर वापरात येणार असून यात सहा गावच्या शिवारातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.

Leave a Comment